Sugar Price Hike | साखरेचा गोडवा महागला, घरखर्चाचा ताळमेळ बिघडला  
छत्रपती संभाजीनगर

Sugar Price Hike : साखरेचा भाव भडकला; किलोमागे दर थेट ७४ रुपयांवर; सणासुदीच्या तोंडावर गोडी महागली

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sugar prices have risen, with the rate hitting ₹74 per kilogram; sweetness becomes costlier ahead of the festive season

ईट, पुढारी वृत्तसेवा: श्रावणातील सण-समारंभानंतर आता रक्षाबंधन, बैलपोळा, गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळीचे सण जवळ आले असतानाच साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर किलोमागे ७४ रुपयांवर पोहोचल्याने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.

महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात साखर ४५ रुपयांच्या आसपास होती. त्यानंतर दरात सातत्याने वाढ होत गेली. काही दिवसांपूर्वी साखरेचा दर ५० रुपयांच्या पुढे गेला होता. आता थेट ७४ रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. अल्पावधीत झालेल्या या दरवाढीची बाजारपेठेत चर्चा सुरू आहे.

श्रावणातील धार्मिक कार्यक्रम, आगामी गणेशोत्सव तसेच सण-समारंभांमुळे साखरेची मागणी वाढली आहे. घरगुती वापराबरोबरच मिठाई, मोदक, लाडू, शिरा, खीर आदी पदार्थांसाठी साखरेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे आगामी काळात मागणी आणखी वाढल्यास दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. आधीच डाळी, खाद्यतेल, तांदूळ, गहू यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती अर्थसंकल्पावर ताण आला आहे. त्यात साखरेच्या दरवाढीची भर पडल्याने सणासुदीची खरेदी महागणार आहे.

उसाला दरवाढीची अपेक्षा

साखरेच्या किरकोळ दरात मोठी वाढ होत असताना उसालाही योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. साखरेच्या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT