मोबाईलच्या 'स्क्रीन'मध्ये हरवले बालपण !

वाशी : शाळा सुटली, पाटी फुटली'चा जमाना गेला, मैदानेही पडताहेत ओस
Childhood lost mobile screen
मोबाईलच्या 'स्क्रीन'मध्ये हरवले बालपण !file photo
Published on
Updated on

Childhood lost in the mobile screen

दादासाहेब लगाडे

वाशी : 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत मैदानाकडे धाव घेणारे बालपण आता चार भिंतींत मोबाईलच्या छोट्याशा पडद्यावर बंदिस्त झाले आहे. पूर्वी वाशी तालुक्यातील गावोगावी शाळा सुटल्यानंतर पारावर, चौकात आणि मोकळ्या मैदानात कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, सुरपारंब्या, चोरा-पोलीस, आंधळी कोशिंबीर, पतंग उडविण्यासह पारंपरिक खेळांची धूम असायची. आता ही मैदाने ओस पडत असून मुले मोबाईलवरील खेळ आणि समाजमाध्यमांच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे.

Childhood lost mobile screen
Dharashiv Crime : मूल देण्‍याचे आमिष दाखवून ४७.८८ लाख रुपये उकळले!

शाळेतून घरी आल्यानंतर अनेक मुले आई-वडिलांचा मोबाईल घेऊन ऑनलाइन खेळ, समाजमाध्यमांवरील चित्रफिती पाहण्यात तासन्तास रमून जातात. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊन लठ्ठपणा, चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष न लागणे आणि एकलकोंडेपणा वाढत आहे. सतत पडद्याकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडणे, जळजळ, लाल होणे आणि दृष्टी कमजोर होण्यासारख्या समस्याही निर्माण होत आहेत. पालकही मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण घालण्यासाठी मोबाईल देत आहेत.

माझा मुलगा शिवांश मोरे अडीच वर्षांचा आहे. तो सतत मोबाईल पाहतो. जेवताना मोबाईल दिला तरच जेवतो. आमच्या कुटुंबात सर्वजण मराठी बोलतात; मात्र मोबाईलमुळे तो आम्हाला हिंदीत बोलतो."
अमोल बाळासाहेब मोरे, पालक, दसमेगाव
Childhood lost mobile screen
Dharashiv News : आरक्षणाचा न्याय्य वाटा द्या; मातंग समाजाचा धाराशिवमध्ये महामोर्चा
मुलांचे आरोग्य आणि क्रीडासंस्कृती जपण्यासाठी शाळा, पालक व सामाजिक संस्थांनी पारंपरिक खेळांचे सामने आयोजित करावेत. वेळीच उपाययोजना न केल्यास मोबाईलचे व्यसन भावी पिढीच्या विकासात अडथळा ठरेल.' -
एस. एल. पवार, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news