भाभा अणू संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी विद्यार्थ्यांचा संवाद File Photo
छत्रपती संभाजीनगर

भाभा अणू संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी विद्यार्थ्यांचा संवाद

महत्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या वतीने भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) येथील शास्त्रज्ञांसमवेत आर्यभट्ट सभागृहात विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

Students interact with scientists from the Bhabha Atomic Research Centre

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महत्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या वतीने भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) येथील शास्त्रज्ञांसमवेत आर्यभट्ट सभागृहात विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. धाबेकर, शास्त्रज्ञ डॉ. कमल शर्मा आणि शास्त्रज्ञ डॉ. बविता तिवारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

या संवाद सत्रास एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. परमिंदर कौर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. संवाद सत्रात शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. धाबेकर यांनी फॅसिनेटिंग हिस्टरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी या विषयावर सविस्तर माहिती दिली.

शास्त्रज्ञ डॉ. कमल शर्मा यांनी ऑफ अॅटोमिक एनर्जी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर शास्त्रज्ञ डॉ. बबिता तिवारी यांनी होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट या विषयावर संवाद साधला. करिअर ऑपॉच्र्युनिटीज इन डिपार्टमेंट अध्यक्षीय समारोप कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी केला. भाभा अणु संशोधन केंद्रातील शा-स्त्रज्ञांचे विद्यापीठात आगमन हे विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.

एमजीएम विद्यापीठात सात विद्याश- ाखांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. दरवर्षी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. परमिंदर कौर यांनी केले तर सूत्रसंचालन सिमरन कौर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT