कंटेनरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : कंटेनरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

छत्रपती संभाजीनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना; वडील गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Student killed in container collision

ढोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : हळदीच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय तेजल काकासाहेब प्रधान हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (४६) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटन शनिवार दि. ९ रोजी दुपारी घडली.

काकासाहेब हे आपली मुलगी तेजल हिला घेऊन दुचाकीवरून बगडी येथे नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. दुपारी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामागीवरील ढोरेगाव शिवारात शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तेजलला मृत घोषित केले.

तिचे वडील काकासाहेब प्रधान यांना गंभीर दुखापत झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षेचा पेपर झाला अन् काळाने गाठलं!

तेजल ही अत्यंत हुशार विद्यार्थर्थीनी होती. तिने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली होती. सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल गुरुवारीच तिने प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर दिला होता. सुट्ट्या लागल्याचा आणि परीक्षा संपल्याचा आनंद साजरा करत असतानाच, २४ तासांच्या आतच तिचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT