Stress and Restlessness Alleviated Through Spiritual Activities
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राजाबाजार परिसरात खंडेलवाल दिगंबर जैन पंचायततर्फे जीवन बदलणारा महायज्ञ या ये विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ग आले होते. हा महायज्ञ रविवारी (दि.१२) सकाळी आचार्य श्री पुष्पदंत सागर महाराज ■ा यांच्या सान्निध्यात संपन्न झाला.
या प्रसंगी उपस्थित गुरु भक्तांना संबोधित करताना आचार्य श्री म्हणाले, महायज्ञ हा केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक कल्याणाचे प्रभावी माध्यम आहे. अशा यज्ञांमुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो तसेच कुटुंब आणि समाजात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते.
सध्याच्या काळात समाज आणि कुटुंबांमध्ये वाढत असलेले मतभेद, तणाव आणि अशांती दूर करण्यासाठी अशा आध्यात्मिक उपक्रमांची अत्यंत गरज आहे. महायज्ञामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि परस्पर प्रेम, बंधुभाव तसेच ऐक्य वृद्धिंगत होते. पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने या महायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमासाठी महावीर पाटणी, प्रकाश अजमेरा, प्रमोद ठोले, महावीर गंगवाल, वर्धमान कासलीवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती अशी माहिती नरेंद्र अजमेरा व पीयूष कासलीवाल यांनी दिली.