चिमुकल्या पेशंटला सदृढ करणे, हे लाख मोलाचे काम : अधिष्ठाता file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : चिमुकल्या पेशंटला सदृढ करणे, हे लाख मोलाचे काम : अधिष्ठाता

नवजात शिशू विभाग : पहिली राज्यस्तरीय केएमसी प्रशिक्षण कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

Strengthening a small patient is a task worth lakhs: Dean

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जन्मजात कमी वजनाचे शिशू, प्री मॅच्युअर बेबी, जे काहीच बोलू शकत नाही. अशा चिमुकल्या पेशंटला सदृढ करणे हे अत्यंत मोलाचे आणि तेवढेच अवघड काम नवजात शिशूशास्त्र विभागात केले जाते. संस्थाप्रमुख म्हणून याचा आनंद आणि अभिमान असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशुशास्त्र विभागातर्फे बजाज संकुल येथे १७मार्च रोजी आयोजित पहिली राज्यस्तरीय केएमसी (कांगारु मदर केअर) सहकारी अध्ययन कार्यशाळ ाप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यशाळेसाठी ज्यांनी भारतात प्रथमच केएमसीची सुरूवात केली अशा जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शशी वाणी आणि राज्यात केएमसीची सुरुवात करणाऱ्या डॉ. रेखा उदानी यांनी मार्गदर्शन केले. मराठवाड्यात कांगारु मदर केअर सुरु करणारे डॉ. एल.एस. देशमुख (विभागप्रमुख नवजात शिशुशास्त्र) हे प्रशिक्षक होते. आठ जिल्हा रुग्णालय उप जिल्हा रुग्णालयासह शहरातील विविध रुग्णालयात केएमसी सेवा पुरविणारे डॉक्टर व परिचारीका अशा ७५ जणांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. अमोल जोशी यांनी केले.

तर डॉ. अतुल लोंढे यांनी कार्यशाळेचे महत्व सांगितले. यावेळी उपाधिष्ठाता डॉ प्रभा खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सुचिता जोशी, ओएसडी डॉ. सुरेश हरबडे, डॉ भिंगारे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी डॉ वर्षा पवार, डॉ कीर्ती राठोड, निलिमा कासार, मनिषा खाडे, आम्रपाली शिंदे यांच्यासह सर्व केएमसी व एनआयसीयू व रिसर्च स्टाफ यांनी परिश्रम घेतले

नव्या इमारतीत संपूर्ण मजला, शंभर खाटा

घाटीच्या प्रस्तावित नव्या १२ मजली इमारतीत नवजात शिशुंसाठी संपूर्ण एक मजला देण्याची ग्वाही अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिली. या मजल्यावर शिशुंसाठी शंभर खाटा असतील. असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT