crime news Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Crime News : गांजाची शेती करणाऱ्यावर छापा मारताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक

चिकलठाणा हद्दीतील बेंबळ्याचीवाडी शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Stones pelted at local crime branch team as they raided a marijuana grower

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गांजाची शेती सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) 1 रात्री आठ ते अकरा वाजेदरम्यान चिकलठाणा हद्दीतील बेंबळ्याची - वाडी शिवारात घडली.

सुपडसिंग रामचंद जोनवाल (४५, रा. लांडकवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळ्याचीवाडी शिव ारात गट क्र. १०९ मध्ये आरोपी सुपडसिंग जोनवाल हा गांजाची झाडे लावून जोपासत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांनी पथकासह बुधवारी रात्री छापा मारण्यासाठी गेले असता पथकावर आरोपी जोनवालसह काही पुरुष आणि महिलांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी त्यांचा प्रतिकार करून जोनवालला पकडले, मात्र अन्य टोळके आणि महिला तेथून पसार झाल्या. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली तेव्हा शेतात २ किलो २३० ग्रॅम वजनाची गांजाची १५ झाडे मिळून आली.

याप्रकरणी आरोपींनी पोलिस कारवाईस दगडफेक करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि एनडीपीएस कायद्यानुसार चिकलठाणा पोलिस ठाण्यात फिर्यादी श्रेणी पीएसआय भागीनाथ वाघ यांच्या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिकलठाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पारधे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT