स्थायी समिती सभापतींचा नव्या दालनातून कारभार सुरू file photo
छत्रपती संभाजीनगर

स्थायी समिती सभापतींचा नव्या दालनातून कारभार सुरू

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी अनिल मकरिये यांना अखेर त्यांच्या हक्काचे दालन मिळाले.

पुढारी वृत्तसेवा

Standing Committee Chairman commences operations from the new chamber

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी अनिल मकरिये यांना अखेर त्यांच्या हक्काचे दालन मिळाले. हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (दि.२) विधिवत पूजन करून त्यांनी नव्या दालनाचा ताबा घेत कारभाराला सुरुवात केली. यावेळी मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.

महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. यात स्थायी समिती सभापतींच्या दालनाचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे लांबले होते. त्यामुळे सभापती अनिल मकरिये यांना तात्पुरते उपमहापौरांच्या दालनालगतचे सभागृह नेत्यांचे दालन वापरावे लागत होते. त्यामुळे सभागृह नेत्यांच्या निवडीची प्रक्रिया काही काळ प्रलंबित राहिली होती.

मात्र आता सभापती स्वतःच्या दालनात स्थायिक झाल्याने हा अडथळा दूर झाला असून, सभागृह नेत्याच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान नव्या दालनात सभापती मकरिये यांनी गुरुवारी विधिवत पूजन करून कार्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मकरिये यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळाबाबत शुभेच्छा दिल्या.

सभापती मकरिये यांना स्वतंत्र दालन उपलब्ध नसल्यामुळे सभागृह नेत्यांची निवड लांबणीवर पडली होती. आता हा प्रशासकीय अडथळा दूर झाल्याने महापालिकेतील पुढील राजकीय व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जनहिताच्या कामांना प्राधान्य

नव्या दालनात विधिवत पूजन करून कार्याचा शुभारंभकेला. पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधी तसेच ना. अतुल सावे यांच्या मार्गदर्शन व विश्वास यामुळे मला स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी मिळाली. या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या कामांना प्राधान्य देत प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करण्याचा माझा संकल्प आहे, असे सभापती अनिल मकरिये यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT