MSRTC : एसटीचे सर्व्हर डाऊन : ॲडव्हान्स बुकिंग ठप्प file photo
छत्रपती संभाजीनगर

MSRTC : एसटीचे सर्व्हर डाऊन : ॲडव्हान्स बुकिंग ठप्प

अनेक गाड्या खोळंबल्या : प्रवाशांसह चालक-वाहकही ताटकळले

पुढारी वृत्तसेवा

ST server down: Advance booking stalled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीची ॲडव्हान्स बुकिंग आणि तिकीट मशीन हाताळणारे सव्र्व्हर शनिवारी (दि.१४) अचानक डाऊन झाल्याने तब्बल दोन तास अॅडव्हान्स बुकिंग आणि दुपारच्या सत्रातील तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणारी मशीनचे काम ठप्प झाल्याने अनेक गाड्या जागेवरच थांबल्या होत्या. सर्व्हर डाऊन झाल्याने वाहकांना तिकीट मशीन न मिळाल्याने प्रवाशांसह त्यांनाही ताटकळावे लागले.

दिवाळी सणानिमित्त शहरात आलेले आणि शहराबाहेरील शहरात येणाऱ्यांची गर्दी शनिवारी मोठ्या प्रमाणात होती. सकाळी ११ च्या सुमारास तिकीट काढणाऱ्या यंत्रणेचे सर्व्हर डाऊन झाल्याने ऐन दिवाळीत अॅडव्हान्स बुकिंगचे काम ठप्प झाले. त्याच बरोबर वाहकांना तिकीट काढण्यासाठी मशीनही देता येत नसल्याने दुपारनंतर विविध मार्गावर धावणाऱ्या बस आगारातच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली तर मशीन नसल्याने चालक आणि वाहकांना सर्व्हर सुरळीत होण्याची वाट पाहत ताटकळावे लागले.

सकाळच्या सत्रात ज्या वाहकांना तिकीट काढण्याचे मशीन मिळाले त्यांचा व्यवहार सुरळीत सुरू होता. दरम्यान ११ वाजेनंतर ही परस्थिती उद्भवल्याने ऑनलाईन तिकीट बुकिंग तसेच प्रवाशांना ऑनलाईन पेमेंट करण्यास अडचणी येत होत्या. अनेकांनी रोख रक्कम देऊन तिकीट काढले तर काही प्रवाशांनी तिकीट प्रणाली सुरळीत होण्याची वाट पाहिली. दिवाळीच्या ऐन गर्दीत सव्र्व्हर डाऊन झाल्याने अधिकाऱ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली.

एसटीची अॅडव्हान्स बुकिंग आणि तिकीट मशीनची यंत्रणा सांभाळणारे सर्व्हर डाऊन झाल्याने एक तो दोन तास ही प्रणाली ठप्प झाली होती. त्यात सुधारणा झाली असून आता पूर्ववत कार्य सुरू झाले आहे. ही अडचण राज्यभरातील आगारांत होती.
संतोष नजन, मुख्य बसस्थानकप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT