ST Bus: 'Lalpari' (red bus) hit by the brunt of drought; 10 percent drop in revenue
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत प्रवशांच्या गर्दीन सर्वच मार्गावरील बस हाऊसफुल्ल राहतात. दरम्यान या वर्षी दुष्काळाच्या झळा सर्वच क्षेत्रात दिसून येत आहेत. याचा फटकाही एसटीला बसला असून, ऑक्टोबर महिन्यांत तब्बल १० टक्के उत्पन्न घटले आहे. दुष्काळांसोबतच एनसीएमसी कार्डामुळेही ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ तसेच महिला प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
परतीच्या पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. शेतकऱ्यांसह कामगार व इतरांच्या उत्पन्नांत मोठ्या प्रमाणांवर घट झाल्याने बाजारात सन्नाटा पसरला आहे. त्यामुळे नागरिकांनीही प्रवासांची काटकसर करण्यास सुरुवात केली आहे.
याचा परिणाम थेट एसटीच्या उत्पन्नांवर झाला आहे. एसटीला छत्रपती संभाजीनगर विभागातून दरमहा ३१ ते ३२ कोटींचे उत्पन्न मिळते. दरम्यान दुष्काळामुळे प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नांत १० टक्के घट झाली आहे. येणाऱ्या दिवसांत उत्पन्नांवर मोठा परिणाम होण्याची शक्यताही घाणे यांनी व्यक्त केली.
हंगामी दरवाढ रद्द
दिवाळीनिमित्त दरवर्षी एसटी १७ दिवसांसाठी तिकिटात १५ टक्के हंगामी दरवाढ करत असते. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हंगामी दरवाढ होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा असला तरी दुष्काळांमुळे प्रवासीच घराबाहेर पडत नसल्याने ही सुविधा देऊनही एसटीला उत्पन्न वाढवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एनसीएमसी कार्डची अडचण
एसटीतून प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ, महिला, अमृत जेष्ठ नागरिकांसह इतर सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकांनी हे कार्ड अद्याप काढले नाही त्यामुळे सवलतधारकांची संख्या रोडावली आहे. तर अनेकांकडे कार्ड किंवा नोंदणी पावत्या असूनही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण तिकीट काढण्याची वेळ येत आहे. त्यामुळेही अनेक सवलतधारकांनी प्रवास करण्यावर हात आकडता घेतला आहे. यामुळेही एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
स्कॅन, टॉपअपमुळे वाहक हैराण
कार्ड नोंदणीच्या पावत्यावरील स्कॅनरवरही तिकीट देण्याची मुभा सवलतधारकांना दिली आहे. दरम्यान अनेकांच्या पावत्या स्कॅनच होत नाहीत तर काहींच्या अडचणी येत आहेत. याचबरोबर कार्डधारकांना टॉप अप मारणे आवश्यक आहे. हे काम सर्व वाहकांवरच येऊन पडल्याने वाहकांची पावती स्कॅन करणे,. टॉप अप मारणे त्यानंतर तिकीट काढणे यात वाहकांची पुरती