दहावी-बारावी परीक्षेत आतापर्यंत ६२ कॉपी केसेस (Pudhari Photo)
छत्रपती संभाजीनगर

SSC HSC exam copy cases : दहावी-बारावी परीक्षेत आतापर्यंत ६२ कॉपी केसेस

कॉपीची सर्वाधिक ३९ प्रकरणे ही एकट्या बीड जिल्ह्यातील

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षांमध्ये यंदा छत्रपती संभाजीनगर विभागात कॉपीच्या तब्बल ६२ केसेसची नोंद झाली आहे. यामध्ये इयत्ता बारावी परी-क्षेत ५४, तर दहावीच्या परीक्षेत ८ कॉपी केसेचा समावेश आहे. कॉपीची सर्वाधिक ३९ प्रकरणे ही एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत.

यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षांना १० फेब्रुवारीपासून आणि इयत्ता दहावीच्या परीक्षांना २० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता दहावीच्या परीक्षेला तब्बल १

लाख ९१ हजार विद्यार्थी परीक्षा होते, तर बारावी परी-क्षेलाही सुमारे पावणेदोन लाख परीक्षार्थीनी अर्ज भरलेले होते. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी यंदा राज्य मंडळाने विविध उपाययोजना केल्या. गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली. यासोबतच बैठी पथके, भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांच्या भेटीदरम्यान विभागात काही ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आले.

बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. स्वतः शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. यानंतर येथील २१ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासोबतच बीड, जालना, परभणी, हिंगोली येथेही कॉपीची प्रकरणे समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT