श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती कल्याणोत्सव विवाह सोहळा उत्साहात file photo
छत्रपती संभाजीनगर

Kalyana Utsava : श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती कल्याणोत्सव विवाह सोहळा उत्साहात

विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती यांचा १७ वा कल्याणोत्सव विवाह सोहळा भक्तिभावात पार पडला.

पुढारी वृत्तसेवा

Sri Lakshmi Venkatesha-Padmavati Kalyana Utsava celebrated with great enthusiasm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भाविकांच्या 'गोविंदा गोविंदा'च्या जयघोषात आणि वेदमंत्रांच्या निनादात येथील श्री विठ्ठल मंदिर, ज्योतीनगर येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती यांचा १७ वा कल्याणोत्सव विवाह सोहळा भक्तिभावात पापडला.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला साखरप सुरू झालेल्या या महोत्सवात नऊ दिवस हजारो भाविकांनी हळद, मेहंदी, अभिषेक अशा विविध सेवा केल्या. दसऱ्याच्या दिवशी यजमान श्रीकांत मणियार यांच्या निवासस्थानी मूर्तीचा अभिषेक, तर मोहिनी जहागीरदार यांच्या निवासस्थानी पूजनानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली.

माजी नगरसेविका सुमित्राताई हळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली १०१ सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले, तर मुख्य संयोजक माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तिरुपतीच्या धर्तीवर सजवलेल्या मंडपात वेदमूर्ती लक्ष्मीकांत जोशी (कांता गुरुजी) यांच्या पौरोहित्याखाली आणि विजयकुमार पल्लोड महाराज, सुनील अत्रे गुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीकांत मणियार, संजय सारडा व बालाप्रसाद झंवर या दाम्पत्यांच्या हस्ते विवाहविधी पार पडला. सोहळ्यानंतर दोन हजारांवर भाविकांनी लाडू व महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT