Sambhajinagar News : बिडकीन येथे 'कट-टू-लेंथ' स्टील प्रक्रिया केंद्र; तयारी सुरू

उद्योगनगरी अर्थातच छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील ऑटोमोबाईल, ओईएम, इलेक्ट्रिकल पॅनेल, प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्ज आणि अभियांत्रिकी उद्योगांची संख्या वाढत आहे.
Sambhajinagar News : बिडकीन येथे 'कट-टू-लेंथ' स्टील प्रक्रिया केंद्र; तयारी सुरू
Published on: 
Updated on: 

'Cut-to-length' steel processing center in Bidkin; preparations underway

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उद्योगनगरी अर्थातच छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील ऑटोमोबाईल, ओईएम, इलेक्ट्रिकल पॅनेल, प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्ज आणि अभियांत्रिकी उद्योगांची संख्या वाढत आहे. या उद्योगांची गरज लक्षात घेऊन व्हीएसटी ग्रुपतर्फे बिडकिनजवळ कट-टू-लेंथ प्रक्रिया केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. या केंद्रात ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ठरावीक लांबीमध्ये स्टील कटिंग करून पुरवठा केला जाणार आहे.

Sambhajinagar News : बिडकीन येथे 'कट-टू-लेंथ' स्टील प्रक्रिया केंद्र; तयारी सुरू
Crime News : तुम्हाला मारण्याची ५ लाखांची सुपारी मिळालीये, १० लाख द्या तरच सोडतो; कुख्यात पवन जैस्वालची उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी

मराठवाड्यातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक परिसंस्थेला अधिक बळ देण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांना दर्जेदार स्टीलचा नियमित पुरवठा सुरळीत करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया आणि व्हीएसटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक ग्राहक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मराठवाड्यातील सुमारे २५० औद्योगिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमादरम्यान उद्योगांसाठी व्हीएसटी ग्रुपतर्फे बिडकिनजवळ कट-टू-लेंथ प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली. यामुळे संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी एएमएनएस इंडियाचे एरिया सेल्स हेड दिनेश पीयूष, एएमएनएस एमएसएमई मार्टचे इंडिया हेड अभिषेक श्रीवास्तव, रिजनल सेल्स हेड विकास छोतिया आणि व्हीएसटी ग्रुपचे संचालक सुमीत अग्रवाल उपस्थित होते.

Sambhajinagar News : बिडकीन येथे 'कट-टू-लेंथ' स्टील प्रक्रिया केंद्र; तयारी सुरू
Graduate Election : पदवीधर निवडणुकीत १.३५ लाख मतदारांची पाठ

हॉट रोल्ड (एचआर), कोल्ड रोल्ड (सीआर) आणि गॅल्वनाइज्ड (जीपी) स्टीलचे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ठरावीक लांबीमध्ये कटिंग करून पुरवठा केला जाईल. स्थानिक पातळीवरच प्रक्रिया सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढेल आणि वेळेची बचत होईल. छोट्या व मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या विशिष्ट ग्रेडच्या स्टीलचा वेळेत व सुरळीत पुरवठा शक्य होईल.

२.१ कोटी टन स्टीलचा वापर

या प्रसंगी सादर आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात वार्षिक सुमारे २.१ कोटी टन स्टीलचा वापर होतो. यामध्ये संभाजीनगर आणि जालना परिसराचा वाटा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशातील स्टीलचा वापर २०३२ पर्यंत २३ कोटी टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्राहकांशी दीर्घकालीन विश्वासाचे संबंध निर्माण करणे आणि मराठवाड्यातील स्थानिक उद्योगांच्या व्यवसायवाढीत विश्वासाचा भागीदार म्हणून योगदान देणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे व्हीएसटी ग्रुपचे संचालक सुमीत अग्रवाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news