Sillod News : भरधाव कारची ट्रकला धडक, एक ठार, महिला जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : भरधाव कारची ट्रकला धडक, एक ठार, महिला जखमी

सिल्लोड : वरखेडीजवळील घटना, मृत छत्रपती संभाजीनगरचा

पुढारी वृत्तसेवा

Speeding car rams into truck; one killed, woman injured

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : भरधाव कार समोरील ट्राल्याला (मोठा ट्रक) धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. १९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-महामार्गावरील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरखेडीजवळ घडला. जळगाव चंद्रशेखर सुभाष शेवाळे (३२, रा. गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे तर ज्योती सतीश गायकवाड (२८, रा. मेहकर, बुलढाणा) असे जखमी महिलेचे नाव आहे.

तरुण व महिला कारने (एमएच-२०, एचएन-४१००) सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. तर या दरम्यान एक ट्रक सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. भरधाव कार ट्रकला पाठीमागून धडकली. यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले.

मात्र चंद्रशेखर शेवाळे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. माहिती मिळताच वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, बीट जमादार धनराज खाकरे, दयानंद वाघ, दराडे यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान मृत, जखमी महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी सोशल मीडिया तसेच कारच्या नंबरवरून माहिती काढली व अपघाताच्या चार तासानंतर ओळख पटली.

अपघातात कारचा चुराडा

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. तर कारच्या पुढचा भाग ट्रकच्या पाठीमागील भागात अडकला होता. मृत व जखमी महिला कारमध्ये अडकले होते नागरिकांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक देखील खोळंबली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT