Vetalwadi Dam : वेताळवाडी धरण भरल्याने सोयगावचा पाणीप्रश्न मिटला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vetalwadi Dam : वेताळवाडी धरण भरल्याने सोयगावचा पाणीप्रश्न मिटला

सोना नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Soygaon's water problem solved after Vetalwadi dam was filled

सोयगाव, पुढारी वृत्तसेवा येथील वेताळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहे. वेताळवाडी धरण भरल्याने सोयगाव आणि शेंदूर्णी गावचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बुधवारी (दि.२० आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वेताळवाडी धरणातील जलाशयाचे पूजन करण्यात आले.

आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकारी नागरिकांशी चर्चा केली. वेताळवाडी धरण ओसंडून वाहत असल्याने सोना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सोना नदीकाठच्या नागरिकांनी आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

वेताळवाडी धरण भरल्याने धरणातून जलविसर्गाबाबत लोकांमध्ये आगाऊ सूचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, नगराध्यक्षा आशाबी तडवी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शाहपुरे, उपविभागीय अभियंता अभय शेळके, शाखा अभियंता प्रीतम राठोड, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, नगर पंचायत शिव-सेना गटनेता अक्षय काळे, फिरोज पठाण, जीवन पाटील, महम्मू पटेल, संतोष बोडखे, हर्षल काळे, गजानन कुडके, कदीर शहा, शेख रऊफ, राजू दुतोंडे, भारत तायडे, भगवान तायडे, भारत इंगळे, अन्वर पठाण, कादर पठाण, युनूसखा पठाण, मजीद नाना, श्रीराम जाधव, सुरेश जाधव, इरफान पठाण आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT