मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची गिनीज बुकात नोंद  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची गिनीज बुकात नोंद

अगाामी काळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र 16 हजार मेगावॅट वीज निर्मिती करू. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी 3 टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

Solar agricultural pump scheme for those who ask gets entry in Guinness Book of World Records

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. अगाामी काळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र 16 हजार मेगावॅट वीज निर्मिती करू. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी 3 टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.5) दिले. ते मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेच्या विश्वविक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलत होते.

हा सोहळा शुक्रवारी शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्‌‍र्सचे कार्ल सॅबेले हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब, आ. सुरेश धस, मित्राचे संचालक प्रवीण परदेशी, अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव नारायण कराड, विश्वास पाठक, सचिन तालेवार, योगेश गडकरी, राजेंद्र पवार, धनंजय औंढेकर, पवनकुमार कछोट आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गिनिज बुकचे पंच कार्ल सॅबेले यांनी महावितरणच्या विक्रमाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौर कृषिपंपाचे डिजिटल लोकार्पण करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

या योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या अखखच बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मेहनत आणि सातत्यामुळे आपण हा विश्वविक्रम करू शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू, पुढच्या वर्षभरात सौर कृषिपंपांची संख्या 10 लाखांवर नेण्याचे महावितरणच्या अधिकार्‌‍यांना सांगितले.

मराठवाड्याची आघाडी

या योजनेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 14 हजार कृषिपंप लावण्यात आले. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळमुक्ती करायची आहे.

या सर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व अतुल सावे यांनीही मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. प्रास्ताविक लोकेश चंद्रा, नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT