जवखेडा येथील बिलवेश्वर महादेव मंदिरात नागाचे दर्शन  (Pudhari Photo)
छत्रपती संभाजीनगर

Shravan Mahina | श्रावण सोमवारी असा हा योगायोग: जवखेडा येथील बिलवेश्वर मंदिरात साक्षात नागराज अवतरले; भक्तांची दर्शनासाठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar News | नागाचे फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

Jawkheda Bilveshwar Mahadev Temple

नाचनवेल: कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. येथील प्राचीन व जागृत बिलवेश्वर महादेव मंदिरात आज (दि.४ ) सकाळी एक अद्भुत आणि चमत्कारीक घटना घडली. पहाटेच्या पूजेदरम्यान महादेवाच्या पिंडीवर साक्षात नागनाथ वेटोळे घालून बसलेले पाहायला मिळाले. हे दृश्य पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले आणि क्षणातच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली.

"हर हर महादेव" आणि "बिलवेश्वर शिव भगवान की जय" च्या जयघोषात मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाहून निघाला. भाविकांनी महादेव व नागनाथांचे मनोभावे पूजन-अभिषेक करून दर्शन घेतले. नागनाथांचे हे दर्शन शिवशक्तीचा चमत्कार आणि शुभशकुन असल्याचे स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितले.

या अद्वितीय प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे अपार श्रद्धा आणि भक्तिभावाची लाट उसळली आहे. मंदिर परिसरात आज दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT