Smart parking app : शहरात लवकरच स्मार्ट पार्किंग ॲप, पार्किंग जागा शोधणे सोपे  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Smart parking app : शहरात लवकरच स्मार्ट पार्किंग ॲप, पार्किंग जागा शोधणे सोपे

मनपाकडून वाहतूक कोंडीवर उपाय

पुढारी वृत्तसेवा

Smart parking app coming soon to the Chhatrapati Sambhajinagar city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट पार्किंग हा प्रकल्प राबवला जाणार आहे. स्मार्ट सिटी कार्यालयातील बुधवारी (दि.९) बैठकीत मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली.

शहरात वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे मस्मार्ट पार्किंगफ सुरू करण्यात येणार आहे. या अॅपमुळे वाहनचालकांना पार्किंग जागा शोधणे सोपे होईल. अनावश्यक फिरणे टळेल. इंधन आणि वेळेची बचत होईल.

यासंदर्भात व्यापारी आणि उद्योजकांच्या सीएमआयए, मसिआ, छत्रपती संभाजीनगर फर्स्ट टीम ऑफ असोसिएशन्सफच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. तसेच या अॅपमुळे दुकानांसमोरची पार्किंग व्यवस्था व्यावसायिक मालमत्ताधारक स्वतः करू शकतील. नागरिकांना कुठेही जाण्यापूर्वी पार्किंग जागा अॅडव्हान्स बुक करता येईल.

आयुक्त श्रीकांत म्हणाले, या योजनेचा उद्देश महसूल मिळवणे नसून वाहतूक शिस्तबद्ध करणे, रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासह वाहन आणि नागरिकांची सुरक्षा वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी एक एजन्सी नियुक्त केली जाणार असून या एजन्सीत केवळ महिलांना रोजगार दिला जाईल.

या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य एजन्सीची निवड करून अॅपची अंमलबजावणी केली जाणार आहे. या बैठकीला नगर रचना उपसंचालक मनोज गरजे, शहर अभियंता फारूक खान, उपायुक्त अपर्णा थेटे, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, उद्योजक आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

महिला कर्मचाऱ्यांकडे व्यवस्थापन

या कामासाठी महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, पार्किंग व्यवस्थापन आणि शिस्त राखण्याचे काम महिलाच करतील. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा मनपा आयुक्तांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT