Sambhajinagar News : स्मार्ट सिटीच्या रस्त्याची पावसात दाणादाण file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : स्मार्ट सिटीच्या रस्त्याची पावसात दाणादाण

प्रतापनगरातील मार्गावर खड्डे; अपघातांचा धोका वाढल्याने वाहनधारक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Smart City roads battered by rain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चुन चौसर ते पीरबाजारापर्यंत उभारण्यात आलेल्या प्रतापनगर रस्त्याची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दोन टप्प्यांच्या जोडणीच्या ठिकाणी मोठी दरी निर्माण झाली आहे. पावसामुळे हा भाग अधिकच खचल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीट उखडून खड्डे पडले असून रस्त्यावर विखुरलेल्या काँक्रीटच्या मोठ्या दगडांमुळे किरकोळ अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र कायमस्वरूपी दुरुस्तीऐवजी केवळ तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असताना रस्त्याची ही अवस्था असेल, तर पुढील काही महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

सिमेंट-काँक्रीट रस्ता अवघ्या काही दिवसांतच उखडल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याची तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जोडणीतील गॅप ठरतोय अपघाताचे कारण

रस्त्याच्या दोन टप्प्यांच्या जोडणीदरम्यान योग्य समतलीकरण न झाल्याने मोठी दरी निर्माण झाली आहे. पावसामुळे हा भाग अधिक AP Smartment C प्रत्येक ( Sisart She येथे मोठा धक्का बसतो. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी संतुलन राखणे कठीण जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

कंत्राटदाराकडून करून घेतली जाईल दुरुस्ती प्रतापनगरातील रस्त्यांची कामे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आली आहेत. जेथे कुठे रस्ता खचला असेल किंवा काँक्रीट उखडले असेल, त्या ठिकाणांची पाहणी करून संबंधित कंत्राटदाराकडून आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाईल.
- संजय कोंबडे, (प्रभारी शहर अभियंता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT