Sambhajinagar News : नगरपरिषद निवडणुकीत संथ सुरुवात, चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज नाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : नगरपरिषद निवडणुकीत संथ सुरुवात, चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज नाही

ऑनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम; सेतू केंद्रावर इच्छुकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Slow start in municipal council elections, no nominations filed in four days

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गंगापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी नामनिर्देशन प्रक्रियेला अद्याप गती मिळालेली नाही. सोमवार (दि.१०) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, चार दिवस उलटूनही एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही, अशी माहिती नगरपरिषद सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

यावषी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे अजर्जाची ऑफलाईन विक्री बंद ठेवण्यात आली असून, इच्छुकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कामकाज सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे १८ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येईल. तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असणार आहे. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र किंवा जातवैधतेसाठी अजीची पावती जोडणे अनिवार्य आहे.

दरम्यान, ऑनलाईन सव्र्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने अर्ज भरताना अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरातील सेतू सुविधा केंद्रांवर उमेदवारांची गदी वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असून, शेवटच्या क्षणी होणारी गदी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रक्रियेत कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे निवडणूक अधिकारी नवनाथ वागवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT