डोहात बुडून सख्या बहिणींचा मृत्यू Pudhari File photo
छत्रपती संभाजीनगर

पैठण : म्हारोळा येथे डोहात बुडून सख्या बहिणींचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

म्हारोळा येथील गायरान शिवारात बकऱ्या चारत असलेल्या सख्या बहिणींचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.25) घडली. मलिका पेद्रस चव्हाण (वय.१२) प्राची पेद्रस चव्हाण (वय.१४) दोघी रा.म्हारोळा गायरान वस्ती ता.पैठण असे मृत मुलींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, म्हारोळा गायरान शिवारात वस्ती करून राहणाऱ्या मालिका व प्राची या सख्या बहिणी नेहमीप्रमाणे गायरान वस्तीवर जवळ असलेल्या पाण्याच्या डोहाजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरून सात ते आठ फूट पाणी असलेल्या डोहात पडल्यामुळे एकमेकीला वाचवत असतांना दोन्ही मुलीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती अग्निष टेलर चव्हाण यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने घटनास्थळ जाऊन पंचनामा केला. मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम दाखल केले आहे. या घटनेसंदर्भात बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पुलिस उपनिरीक्षक महेश घुगे हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT