Since the third child was also a girl, her in-laws performed an abortion right inside the house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन मुलींनंतर तिसऱ्यांदाही मुलगीच होणार असल्याचे समजताच, पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला घरातच बेकायदेशीर औषधे देऊन तिचा गर्भपात करण्यात आल्याची संतापजनक घटना नारेगाव, बलुच गल्लीत ६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात सासरच्या मंडळींसह जालन्यातील एका महिलेवर आणि दोन अन ोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरा फेरोज मन्सूर सय्यद, गर्भपातासाठी आलेली कमळ गोकूळ तिनगोटे, दोन पुरुष व एक महिला यांचा आर- ोपींमध्ये समावेश आहे.
फिर्यादी २६ पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना सनाया (५ वर्षे) आणि अनाया (२ वर्षे) नावाच्या दोन मुली आहेत. पहिली मुलगी जन्माला आली तेव्हा सासरच्यांनी त्यांना माहेरी सोडून दिले होते, तर दुसऱ्या मुलीच्या वेळी पती अरबाजने त्यांना रुग्णालयातच सोडून पळ काढला होता. आता रिजवाना तिसऱ्यांदा गरोदर असताना पुन्हा एकदा हाच वाद उफाळून आला.
२७ फेब्रुवारी रोजी दुपारी पती अरबाजने दोन पुरुष आणि एका अनोळखी महिलेला घरात आणले. त्यांच्याकडे लिंग तपासणीची मशीन होती. रिजवाना यांचा विरोध असतानाही पती, सासू आशीया आणि सासरे फेरोज सय्यद यांनी त्यांना बळजबरीने तपासण्यास भाग पाडले. पोटात मुलगी आहे असे त्या लोकांनी सांगताच सासरच्यांनी गर्भपातासाठी दबाव टाकून मारहाण करण्यास सुरुवात केली. मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, पतीने पुन्हा कमल तिनगोटे (रा. जालना) आणि इतर दोन पुरुषांना घरी बोलावले.
यावेळी त्यांनी रिजवाना यांना गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घातल्या. काही वेळातच त्यांना तीव्र कळा सुरू झाल्या. त्यांनी आरडाओरड केली, मात्र आरोपींनी त्यांचे पोट दाबून त्यांना अधिक त्रास दिला. रॅकेटचे पुन्हा जालना कनेक्शन दोन वर्षांपूर्वी पुंडलिकनगर भागात उघडकीस आलेल्या गर्भनिदान, गर्भपात करणाऱ्या रॅकेटमध्येही जालन्याची टोळी होती. आता नारेगावच्या घटनेतही आर-ोपी महिला जालन्याचीच आहे. घराघरांत जाऊन मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पुंडलिकनगरच्या रॅकेटमधील आरोपींचे हस्तक पुन्हा नव्या भागात गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे.
पोलिस येताच आरोपींचे पलायन
स्वतःची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच रिजवाना यांनी वडिलांना फोन करून मदतीसाठी बोलावले. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील आणि काका पोलिसांना घेऊन घरी पोहोचले. पोलिसांची गाडी पाहताच गर्भपात करण्यासाठी आलेले दोन पुरुष आणि कमल तिनगोटे घराच्या मागच्या दरवाजातून पळून गेले. पोलिसांनी तातडीने पीडितेची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.