Silver Price in 2026 Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Silver Prices : चांदी प्रतिकिलो पुन्हा तीन लाख पार

दोन दिवसांत ३७ हजारांची वाढ, सोनेही प्रतितोळा ६ हजारांनी वधारले

पुढारी वृत्तसेवा

Silver crosses three lakh rupees per kg again

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

चांदीचे दर तब्बल ४ लाख १५ हजारांच्या विक्रमी उच्चाकांवर पोहोचल्यानंतर चार दिवसांतच दीड लाख रुपयांनी घसरले होते.

यानंतर मागील दोन दिवसांत चांदी पुन्हा ३७ हजारांनी वाढली आहे. सोनेही दोन दिवसांत सहा हजार २५० रुपयांनी वाढले. मंगळवारी सराफा बाजारात चांदी ३ लाख ४ हजार रुपये किलो, तर सोने १ लाख ६३ हजार २५० दराने विकल्या गेल्याचे जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

मागील महिन्याभरापासून जागतिक स्तरा-वरील घडामोडी आणि अनिश्चितता यामुळे सराफा बाजारात महिन्याभरापासूनच मोठी उलथापालथ सुरू आहे. याच कारणाने लग्नसराईच्या आधीपासूनच सराफा बाजारात तेजीही पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी गुरुवारी चांदीचा भाव तब्बल ४ लाख १५ हजारांच्या उच्चाकांवर पोहोचला होता. मात्र चारच दिवसांत चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन प्रतिकिलो चांदीचे भाव २ लाख ६७ हजारांपर्यंत गडगडले होते.

यानंतर सोमवारी चांदीच्या दरात तब्बल २३ हजारांची, तर मंगळवारी १४ हजार रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो चांदीचे भाव ३ लाख ४ हजार रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे प्रतितोळा एक लाख ८५ हजारांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले सोनेही २८ हजारांनी स्वस्त होऊन १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र मागील दोन दिवसांत सोनेही ६ हजार २५० रुपयांनी वधारल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT