सिल्लोडचा नायब तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात ! Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Bribe Case : सिल्लोडचा नायब तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात !

वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना सेतू चालकालाही रंगेहाथ अटक

पुढारी वृत्तसेवा

Sillod's Deputy Tehsildar Caught in ACB Trap!

छत्रपती संभाजीनगर / सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : वाळूने भरलेला ट्रॅक्टर विनाकारवाई सोडून देण्यासाठी आणि हद्दीमध्ये वाळू वाहतूक विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणारे सिल्लोडचे नायब तहसीलदार हारुण अजिज शेख (५६, रा. हतनूर बसस्टँडजवळ, ता. कन्नड) आणि त्यांच्या वतीने १० हजारांची लाच स्वीकारणारा सेतू सुविधा केंद्राचा चालक युवराज अभिमान तायडे (५६, रा. जयभवानीनगर, सिल्लोड) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली.

यातील ४५ वर्षीय तक्रारदार हे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने गौण खनिजाची (वाळू) वाहतूक करतात. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा अधिकृत परवानाही आहे. ३ एप्रिल रोजी नायब तहसीलदार हारुण शेख यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवला होता. तक्रारदारांनी अधिकृत परवाना दाख-वूनही तू ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरतोस, असे सांगून कारवाई करण्याची धमकी शेख यांनी दिली.

पकडलेला ट्रॅक्टर कोणतीही कारवाई न करता सोडण्यासाठी आणि यापुढे हद्दीत वाळू वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी नायब तहसीलदार शेख यांनी थेट २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारद राराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ एसीबीकडे तक्रार दिली. पथकाने सोमवारी (दि.६) पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी नायब तहसीलदार हारून शेख याने तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच यापैकी १० हजार रुपये सेतू सुविधा केंद्राचा चालक युवराज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT