सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होऊनही पिण्याचे पाणी, रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा संकटाच्या काळात कायगाव (ता. सिल्लोड) येथील पाझर तलाव क्रमांक १ मधील अत्यल्प जलसाठ्यावर विद्युत मोटारींद्वारे भरदिवसा शेतीसाठी पाणी उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, सौरऊर्जेचा वापर करूनही पाण्याची चोरी सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदा पावसाचे उशिरा आगमन, दीर्घ खंड आणि अत्यल्प पर्जन्यमान यामुळे निल्लोड व कायगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. महागडी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाची आशाही धूसर झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, मजुरांकडे रोजगार नाही, तर गावोगावी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची चिंता वाढत आहे.
एकीकडे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे तलावातील उरलेसुरले पाणी खासगी शेतीसाठी उपसले जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग, तलाठी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. धनदांडग्यांच्या दबावामुळे की अन्य कारणांमुळे कारवाई होत नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे.
पाणी उपसा करणाऱ्यां संबंधितांवर कठोर कारवाई कराव अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून हो आहे. दुष्काळ जाहीर करणे पुरेसे नाह दुष्काळग्रस्तांचे वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कृती होप् गरजेचे आहे. अन्यथा तहानलेल्य माणसांसह मुक्या जीवांच्य वाट्यालाही पाणी उरणार नाही !
प्रशासनाचे दुर्लक्ष
दुष्काळात सार्वजनिक जलसाठ्याचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. तलावातील पाणी केवळ शेतीसाठी नसून परिसरातील जनावरे, पशुपक्षी आणि वन्यजीवांच्या जगण्याचाही आधार आहे. त्यामुळे सिल्लोड तहसीलदार व दुष्काळ निवारण समितीने तातडीने पाहणी करून अनधिकृत पाणीउपसा थांबवावा, विद्युत मोटारी जप्त कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.