Shri Sant Eknath Maharaj Palkhi palanquin stay near Kharda Bhuikot Fort
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी गुरुवारी (दि.२६) पालखी मार्गावरील खर्डा (शिवपट्टण) भुईकोट किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करण्यासाठी दाखल झाले.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आठवा मुक्काम दिघोळे येथे संपत्र झाल्यावर वारकऱ्यांनी मोहरी येथे दुपारचा विसावा घेतला. परिसरातील भाविक भक्तांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतल्याने सोहळा वाजत गाजत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
सायंकाळी ऐतिहासिक खर्डानगरीत दाखल झाला. यावेळी येथील भाविकांनी वारकऱ्यांच्या मार्गावर रांगोळी काढून नाथांच्या पादुका पालखीवर फुलांचा श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यांतील विविध गावांतून पायी दिंडीद्वारे प्रवास केला आहे. दहाव्या मुक्कामासाठी शुक्रवारी (दि. २७) धाराशिव जिल्ह्यात दाखल होऊन दांडेगाव (ता. भूम) या ठिकाणी पालखी पोहोचणार आहे.
सरपंच संजीवनी पाटील, महालिंग कोरे, विश्वनाथ जामकाळे, संजय पैठणपगारे यांच्यासह गावातील भाविकांनी स्वागत केले. पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी नाथांच्या पादुका येथील श्रीराम मंदिरामध्ये विसावासाठी ठेवण्यात आल्या. यावेळी दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
प्रशासनाच्या वतीने प्रथमच वारकऱ्यांना शासन स्तरावर मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था केली. मुक्कामाच्या ठिकाणी जनरेटर, आंघोळीसाठी व्यवस्था, ठिकठिकाणी कचराकुंडी, शेकडो वारकरी झोपण्यासाठी प्रशस्त वॉटरपूफ मंडप व्यवस्था केली होती.
यासह वैद्यकीय सेवा देण्यासाठी स्वयंसेवक, डॉक्टरही होते. वारकऱ्यांना अडीअडचण निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत होती. या व्यवस्थेबद्दल श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी म्हणाले, वारीच्या इतिहासामध्ये प्रथमच प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येत आले आहे.
श्रीमंत संत एकनाथ महाराज पालखी सो-हळा खर्डा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे मुक्कामासाठी दाखल झाला.