Chhatrapati Sambhajinagar : पंढरीची वारी जीवनातील दुःख निवारी : रामगिरी महाराज  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : पंढरीची वारी जीवनातील दुःख निवारी : रामगिरी महाराज

श्री क्षेत्र सराला बेट दिंडीचे पंढरपूरकडे वाजत गाजत प्रस्थान

पुढारी वृत्तसेवा

Shri Kshetra Sarala Bet Dindi to Pandharpur

गंगापूर : पुढारी वृत्तसेवा

सत्कमींनीच कर्म शुद्ध होऊन दुःख दूर होऊ शकतं. देव दयाळू नाही, तर न्यायी आहे हे विश्वातलं कठोर सत्य आहे. भक्तियोग आणि कर्मयोग वेगळा नाही तर ते दोन्ही एकमेकांना परस्पर पूरक आहेत. भक्तीद्वारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते. गंगागिरी महाराज निष्काम वारी करत. निष्काम भावनेने कर्म करीत राहिल्यास देवाला त्याचे फळ द्यावेच लागते. वारी केल्याने भक्ताच्या जीवनातील दुः खाचे निवारण होत असल्याचे प्रतिपादन आज महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्री क्षेत्र सराला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास शुक्रवारी बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायण गिरीजी महाराज यांच्या पाद्य-पूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत प्रारंभ करण्यात आला. या दिंडीत सुमारे २५००, ते ३ हजार वारकरी सहभागी झाले आहे. २०० वर्षांपूवी योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली दिंडी परंपरा आजतागायत सुरू ठेवली आहे.

आपल्या दिंडीत सहभागी होणारा भाविक श्रध्दाळू हा गोरगरीब शेतकरी असून यावर्षी भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संकल्प ते सिध्दी तक, ऐक पेड माँ के नाम या वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रमातर्गत श्री क्षेत्र सराला बेट ते लाडगाव या ७ कि. मी. रस्ताच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी संभाजीनगर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय खांबायते, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, डॉ. दिनेश परदेशी, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, अविनाश पाटील गंलाडे, बाबासाहेब चिडे, बबनराव मुठे, विजय पवार, नारायण कवडे, पंकज ठोंबरे, दत्तु खपके, हरिशरण गिरी महाराज, संदिपान महाराज, योगानंद महाराज विश्वनाथ गिरी, महाराज विक्रम महाराज डॉ कोते, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराजांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT