

Electrical shop broken into, goods worth lakhs looted
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका इलेक्ट्रिकल्स दुकानाचे पत्रे उचकटून अंदाजे एका लाखाचे इलेक्ट्रिक, हार्डवेअरचे साहित्य घेऊन पसार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील माणिकनगर (भवन) येथे घडली.
विजय थोरात यांचे श्री. स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअरचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील पत्रे उचकटून आत प्रवेश केला व इलेक्ट्रिक, हार्डवेअरचे सामान घेऊन पसार झाले.
शनिवारी (दि. २१) सकाळी विजय थोरात यांनी दुकान उघडल्यावर चोरीची घटना निदर्शनास आली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांन विर- ोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार दीपक पाटील करीत आहेत. दरम्यान विजय थोरात यांनी बँकेचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला होता. त्यात दुकानात चोरी झाल्याने तरुण व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे