Knife Attack : गाडी दुरुस्तीचे ७८ हजार बुडवण्यासाठी शोरूम कर्मचाऱ्यावर केला चाकूहल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Knife Attack : गाडी दुरुस्तीचे ७८ हजार बुडवण्यासाठी शोरूम कर्मचाऱ्यावर केला चाकूहल्ला

दोघांनी 'ट्रायल'च्या बहाण्याने थार पळवली; एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Showroom employee stabbed to evade ₹78,000 vehicle repair bill

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी दिलेली 'थार' गाडी सोडवण्याचे ७८ हजारांचे बिल बुडवण्यासाठी चक्क सर्व्हिस अॅडव्हायझरला 'ट्रायल'च्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर चाकूहल्ला करून आरोपी थार घेऊन पसार झाले. हा थरार शुक्रवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक विष्णू पठाडे आणि त्याचा साथीदार 'भाऊ' अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी सैफ खान चांद खान (३२, रा. बायजीपुरा) याच्या तक्रारीनुसार, तो एमआयडीसी चिकलठाणा येथील रत्नप्रभा वर्कशॉपमध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर म्हणून कार्यरत आहे. दीपक पठाडे याने त्याची थार गाडी (एमएच-१९ डीव्ही-४९६०) दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये दिली होती. वाहनाचे सस्पेन्शन, ऑइल लिकेज, बंपर आणि सर्व्हिसिंग अशी कामे करण्यात आली होती.

याचे एकूण ७८ हजार ८०७ रुपयांचे बिल झाले होते. १२ जून रोजी काम पूर्ण झाल्यानंतर खान यांनी पठाडे याला गाडी घेऊन जाण्यासाठी बोलावले. रात्री नऊच्या सुमारास पठाडे आणि त्याचा साथीदार वर्कशॉपमध्ये आले. बिलाची रक्कम भरल्याशिवाय अंतिम 'गेटपास' मिळणार नाही, असे खान यांनी स्पष्ट केले. मात्र, आरोपींनी पैशांची तडजोड न करता 'आधी गाडीची ट्रायल घेऊ,' असा हट्ट धरला.

जखमी खान यांना आरोपींनी चालत्या वाहनातून खाली ढकलून दिले आणि थार घेऊन पोबारा केला. खान यांनी कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक कैलास लहाने करत आहेत.

निर्जनस्थळी नेऊन जीवघेणा हल्ला

खान यांना गाडीत बसवून या दोघांनी ट्रायल सुरू केली. मात्र ठरलेल्या मार्गावर न जाता पैसे काढण्याच्या बहाण्याने गाडी प्रोझोन मॉलवरून चिकलठाण्याकडे वळवली. माँसाहेब चौकाजवळील एका निर्जन भागात पोहोचताच, पठाडेसोबत असलेल्या 'भाऊ' नावाच्या गुंडाने खान यांना शिवीगाळ करत चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या झटापटीत खान यांच्या डाव्या दंडाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चार टाके पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT