Sambhaji Nagar News : आ. प्रदीप जैस्वालांच्या घरीही शिवसैनिकांची धडक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : आ. प्रदीप जैस्वालांच्या घरीही शिवसैनिकांची धडक

क्या हुआ तेरा वादा... महायुती आश्वासनांची पूर्तता कधी करणार ?

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Ubatha Party workers met Shinde Sena MLA Pradeep Jaiswal at his house.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्वतेबद्दल विचारणा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकत्यांनी भाजप कार्यालयावर धडक दिली होती. त्यापाठोपाठ पक्षाचे एक शिष्टमंडळ शनिवारी शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या घरी पोहचले. महायुतीकडून आश्वासनांची पूर्तता कधी होणार ? असा सवाल त्यांनी जैस्वाल यांच्याकडे केला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकरी आणि इतर वर्गाबाबत विविध आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत येऊनही त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाने आजपासून क्या हुआ तेरा वादा, अशी विचारणा करणारे आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक घेट भाजप कार्यालयावर धडकले होते.

तिथे त्यांनी राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले होते. त्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी काही कार्यकर्ते शिदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या निरालाबाजार येथील घरी पोहचले. यावेळी जैस्वाल यांनी सर्व कार्यकत्यांनी आत बोलावून त्यांच्याशी तासभर चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने संकल्पपत्र काढले होते. यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १२ हजारांवरून १५ हजार अनुदान दिले जाईल, अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता केले जाईल, लाडक्या बहिणीचे अनुदान १५०० रुपयांवरून २१०० रुपये केले जाईल, असे जाहीर केले होते. परंतु ही आश्वासने आत्तापर्यंत पूर्ण का झाली नाहीत, अशी विचारणा यावेळी कार्यकत्यांनी जैस्वाल यांच्याकडे केली.

त्यावर जैस्वाल यांनी वचननाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असे आश्वासनही त्यांनी दिले. याप्रसंगी बाळासाहेब थोरात, आनंद तांदूळवाडीकर, लक्ष्मीनारायण बाखरिया, गोपाळ कुलकर्णी, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, सुरेश पवार, नरेश मगर, मिथुन व्यास, सीताराम सुरे, संदेश कवडे, संजय हरणे, बन्नी जाधव, सचिन सौरे, तुळशीराम बकले, अमोल पवार, सतीश कटकटे आदींची उपस्थिती होती.

66 हिंदसेनेच्या आमदारांकडेही बाऊनन दाखवा, असे आव्हान भाजप आमदार संजय केणेकर यांनी दिले होते. त्याला प्रत्युत्तर माणून आज शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या घरी जाऊन महायुतीच्या आश्वासनांबद्दल विचारणा केली.
- बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख, शिवसेना उबाठा.
66 शिवसेना उबाठा पक्षाचे शिष्टमंडळ आले होते. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणे असो किंवा शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देणे असो यासाठी मी देखील आग्रही आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.
प्रदीज जैस्वाल, आमदार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT