Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर पुलाला भगदाड

माळीवाडा येथील पुलावरील प्रकार, बांधकामाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह
Samruddhi Highway
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर पुलाला भगदाड File Photo
Published on
Updated on

Bridge damage on Samruddhi Highway, incident on Maliwada bridge

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

मुंबई-नागपूर हा ७०० किलोमीटर सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील रस्त्याचे गुरुवारी (दि. ५) लोकार्पण झाले. परंतु, हे होत असतानाच लागलीच दुसर्याच दिवशी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या या रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा येथील उडू णपुलाचा स्लॅब अचानक वाहतूक सुरू असतानाच कोसळला. केवळ अडीच वर्षातच पुलाचा स्लॅब कोसळल्याने कामाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Samruddhi Highway
Ajanta Caves : अजिंठा लेणीत आग्यामोहळ बिथरले; २०० पर्यटक जखमी

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ओळखला जातो. नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरदरम्यान सुसज्ज असा हा महामार्ग तयार झाला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यांतील ३० तालुके आणि ३६५ गार्वातून हा महामार्ग जातो. त्यामुळे हा महामार्ग विकासासाठी लाभदायक ठरणार आहे. परंतु, असे असले तरी आता या पुलाच्या काही टप्प्यातील कामांवरच प्रचिन्ह निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वीच हा सुपरफास्ट महामार्ग नागपूर-मुंबईपर्यंत खुला केला आहे.

मात्र, या मार्गात येणार्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा येथे जो पूल बांधण्यात आला. त्याच्या स्लॅबला शुक्रवारी अचानक भगदाड पडले, अन् स्लॅबचा काही भागा तुटून खालच्या रस्त्यावर कोसळला, यावेळी रस्त्यावरून वाहतूक सुरू होती. सुदैवाने कुठलाच अपघात घडला नाही. दरम्यान, नागपूर ते शिर्डी या रस्त्याचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून या रस्त्याचे ११ डिसेंबर २०२२ लोकार्पण करण्यात आले. अवध्या अडीच वर्षांतच पुलाचा भाग कोसळत असेल तर बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Samruddhi Highway
Marathwada News : मराठवाड्यातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा

... तर बरिकेड्स का लावले नाही

समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४२+४७० वरील व्ही.यु.पी. च्या नागपूर दिशेकडे जाणाऱ्या पुलाच्या मार्गावरील तिसऱ्या लेनमधील डेक स्लॅबवा खालचा भाग पडला आहे. हा भाग जर आम्हीच पाडला असे एमएसआरडीसीनेच्या अधिकार्याचे सांगणे असेल तर हा क्षतिग्रस्त भाग पडताना सुरक्षेचा विचार करून बरिकेड्स का लावण्यात आले नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

एमएसआरडीसी म्हणते आम्हीच पाडला

माळीवाडा येथील सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब अचानक कोसळला. हे काम मेगा इंजिनियरिंग या कंत्राटदाराने केले आहे. याबाबत पुढारीने न्यूजने वृत्त प्रसारित करताप पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाल्याने आम्हीच पाडता, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महामंडळाने पूल क्षतिग्रस्त झाल्याचे कबुली देत एक प्रकारे कामाच्या दर्जाबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नचिन्हांवर शिकामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news