Shiv Sena Ubatha Party organizes Shiv Sampark campaign preparatory camp
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पक्षासाठी सध्याची वेळ कठीण आहे. पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनीच गद्दारी केली. पक्षाचे नाव, चिन्ह पळविले. पण पक्षाचा मतदार अजूनही कायम आहे. त्यामुळे वेळ कठीण असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपणच जिंकणार असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने आयोजित शिबिरात वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने शनिवारी मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निष्ठावंत शिवसंपर्क मोहीत पूर्वतयारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पक्षाचे सचिव अनिल देसाई, नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, उपनेते विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, लक्ष्मणराव वडले, उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार उदयसिंग राजपूत आदींची भाषणे झाली.
संकट नव्हे ही तर संधी संकटात संधी शोधायला हवी, असे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात गद्दारी झाली. गद्दारांचा सामना करण्यासाठी शिवसैनिक यांच्याकडे आशेने बघत आहे. शिवसैनिकानी गद्दारीचा बदला घेतला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बदला घेऊन गद्दारांना गाडायचे आहे.- अनिल देसाई, पक्ष सचिव
गद्दारांचे वाटोळे होणार 66 आगामी काही काळातच गद्दार लोकांचे वाटोळे होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मनपा निवडणूक गंभीर्याने घेतली आहे. शिवसेनाप्रमुख यांनी गद्दार गटाला मोठे केले तरीही ते पळून गेले.. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी जबरदस्त काम केले असून महाराष्ट्राचे रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते.चंद्रकांत खैरे, नेते
आमदाराच्या जाचातून सुटका 66 सध्या शिवसेनेनेसमोर संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तिकीट वाटप करताना निष्ठावंतांना संधी दिली जाईल. आतापर्यंत तिकीट वाटपावेळी आमदारांचे चोचले पुरवावे लागत होते. आता आमदाराच्या जाचातून शिवसेना बाहेर पडली आहे. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे.विनोद घोसाळकर
आमदाराच्या जाचातून सुटका
66 सध्या शिवसेनेनेसमोर संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तिकीट वाटप करताना निष्ठावंतांना संधी दिली जाईल. आतापर्यंत तिकीट वाटपावेळी आमदारांचे चोचले पुरवावे लागत होते. आता आमदाराच्या जाचातून शिवसेना बाहेर पडली आहे. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे.
विनोद घोसाळकर
निवडणुका तीन टप्प्यांत 66 राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होण्याचे संकेत आहेत. डिसेंबर ते जानेवारीमध्ये निवडणूक होईल. गद्दारीच्या रूपाने शिवसेनेवर संकट आले होते. निवडणूक लढविण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. भ्रष्टाचाराचे हे मुद्दे आपण मांडले पाहिजेत.अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते