Chhatrapati Sambhaji Nagar : गंगापूर तहसील कार्यालयावर धडकला शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : गंगापूर तहसील कार्यालयावर धडकला शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा

क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचे देणे फेडा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena tractor march Gangapur Tehsil office

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा :

गंगापूर शहरात शिवसेना (उबाठा) च्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाद्वारे शासनाच्या अपूर्ण आश्वासनांविरोधात आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयासमोर झाला. यावेळी तहसीलदार नवनाथ वागवाड यांना निवेदन सादर करण्यात आले.

क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचे देणे फेडा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाचे नेतृत्व उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांनी केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात, कर्जमाफी, पीक विमा, अखंड वीज पुरवठा, सिंचन सुविधा अशा शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे नेते लक्ष्मण सांगळे म्हणाले की, शासनाने दिलेली आश्वासने केवळ निवडणुकीपुरती मर्यादित होती का? शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.

मोर्चात उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंब, तालुका प्रमुख सुभाष कानडे, उपतालुकाप्रमुख रवींद्र पोळ, शुभम बाराहाते, दादा जगताप, कैलास हिवाळे, रावसाहेब टेके, माजी नगरसेवक विजय पानकडे, भाग्येश गंगवाल, कैलास साबणे, पांडुरंग कापे, ज्ञानेश्वर बोरकर, भानुदास पवार, श्रीलाल गायकवाड, अभय भोसले, ओम भड, गोविंद बल्ले, गणेश राजपूत, कारभारी दुबिले, बाळासाहेब चणघटे, मुन्ना भोसले, साईनाथ खाजेकर, नितीन तांबे, बाळासाहेब शेळके, प्रकाश रोडगे, राजू गावंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवून मोर्चा शांततेत पार पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT