विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

सात हजार ईव्हीएम, चार हजार व्हीव्हीपॅट अन् १७ हजार कर्मचारी; विधानसभेची तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी सात हजार ईव्हीएम, चार हजार व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीन तयार ठेवल्या आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या आधीच प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण करून ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघांतील मतदारांची एकूण संख्या ३१ लाख इतकी आहे. सुधारित मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या.

एवढेच नव्हे तर निवडणुकीसाठीची सर्व तयारीही निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर झाली तरी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ३,२६४ मतदान केंद्र असतील.

सध्या ३,९२६ कंट्रोल युनिट आणि ७,१०९ बॅलेट युनिट याप्रमाणे ईव्हीएम आहेत. तर व्हीव्हीपॅटची संख्याही ४२५० इतकी आहे. जिल्ह्यात निवडणूक घेण्यासाठी १३ हजार ५६ कर्मचारी लागणार आहेत. त्यावर २५ टक्के राखीव कर्मचारी संख्या विचारात घेतल्यास एकूण १६, ३२० कर्मचारी लागणार आहेत.

ईव्हीएमबाबत जिल्हाभर जागृती

देशात मागील अनेक वर्षांपासून निवडणुकीमध्ये मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर होतो आहे. परंतु अलीकडच्या काळात ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल काही राजकीय नेत्यांकडून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आता आयोगाने ईव्हीएम सुरक्षित असल्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हाभरात ठिकठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ठेवून मतदानाचा डेमो दाखविला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT