प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

एमआयडीसी सिडको पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Security guard dies of electric shock while spraying water at construction site

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी सिडको परिसरात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना, विजेचा धक्का लागून २४ वर्षीय सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन भीमराव निकाळजे (२४, मूळ रा. एकतुनी, ता. पैठण, सध्या रा. म्हाडा कॉलनी) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव असून, या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सिडको परिसरात एका नवीन इमारतीचे बांधकाम वेगात सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडे अर्जुन निकाळजे हे सुरक्षारक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून कार्यरत होते. सुरक्षेच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्याकडे या नवीन बांधकामावर पाणी मारण्याचीही जबाबदारी देण्यात आली होती.

गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्जुन हे नेहमीप्रमाणे बांधकामाला पाणी मारत होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का सला आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे, अशी माहिती हवालदार अरविंद मेने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT