Maharashtra School Band 24 November 2025
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने मंगळवारी (दि.४) रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे राज्यभरातील शिक्षकांच्या गंभीर प्रश्नांवर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रतापरीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविर ोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.
दोन आठवड्यांच्या आत याबाबत कार्यवाही न झाल्यास २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व राज्य महाराष्ट्र महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना यांनी दिला आहे.
टीईटी सक्तीचा निर्णय लागू करताना अनुभवी शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या सेवा-सुविधांवर गदा येऊ नये, अन्यथा शिक्षण क्षेत्रात मोठा असंतोष उसळेल. याबाबत गांभीयनि विचार करून त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे प्रसिध्दीप्रमुख तसेच मराठवाडा विभागीय प्रसिध्दी प्रमुख सतिष कोळी यांनी कळविले आहे. यावेळी शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजित राठोड, नितीन नवले, शाम राजपूत आदी उपस्थित होते.