Vighnahar Multistate Scam : हिंगोलीच्या विघ्नहर मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा घोटाळा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vighnahar Multistate Scam : हिंगोलीच्या विघ्नहर मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

१२ टक्के व्याजाचे आमिष; भुसा व्यावसायिकाची १ कोटीची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Scam worth crores in Hingoli's Vighnahar Multistate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

मराठवाड्यातील मल्टीस्टेटमध्ये घोटाळ्याचे सत्र सुरूच असून, त्यात हिंगोलीच्या विघ्नहर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची भर पडली आहे. १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून भुसा व्यावसायिकाची १ कोटी रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार १० मे २०२३ ते १३ डिसेंबर २०२५ या काळात खिवंसरा पार्क, उल्कानगरी येथील शाखेत उघडकीस आला.

मल्टीस्टेटचे मुख्य सल्लागार व अध्यक्ष मथुरादास देशमुख (मृत, रा. बीड बायपास), डॉ. क्याटमवार, वीरसिंह आणि आर. जी. बाहेती (तिघे रा. वसमत, जि हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी शेख तौफिक मोहंमद शफी (रा. टाइम्स कॉलनी, कटकटगेट) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भुसा बनविण्याचा व्यवसाय आहे. खिवंसरा पार्क येथे असलेल्या विघ्नहर मल्टीस्टेटचे मुख्य सल्लागार व अध्यक्ष मथुरादास देशमुख यांची कामानिमित्त भेट झाली होती. तेव्हा त्यांनी पतसंस्थेत एक वर्षासाठी - ठेवी ठेवल्यास १० ते १२ टक्के व्याज मिळेल, असे सांगून बचत करण्याबाबत विनंती - केली. शेख यांनी १० मे २०२३ रोजी खाते Vighnahar Multistate Co उघडले. प्रारंभी ५५०० नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी १ कोटी ५ हजार ५०० रुपयांच्या ठेवी ठेवल्या. देशमुख यांनी जमा रकमेतून ९१ दिवसांसाठी ९३ लाख ५ हजार ५०० रुपये मुदत ठेव गुंतवणूक केल्यास तुम्हाला २ लाख ८ हजार ८०० रुपये व्याज मिळेल, असे आमिष मुदत ठेव पावती दाखविल्याने शेख यांनी १ एप्रिल २०२५ रोजी रक्कम मुदतठेव केली.

दरम्यान त्यांना पैशाची गरज पडल्याने मुदतीपूर्वी पैसे परत घेण्यासाठी १ जून २०२५ रोजी विघ्नहर मल्टीस्टेटच्या खिवंसरा पार्क येथील शाखेत गेले. तेव्हा मॅनेजरने अध्यक्ष देशमुख यांना कॅन्सर झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर शेख यांनी वारंवार शाखेत चकरा मारूनही पैसे मिळाले नाही. त्यांनी देशमुख याना फोन केला मात्र सगळेच टाळाटाळ करू लागले. त्यांच्यासह अन्य ठेवीदारांचेही पैसे परत मिळत नसल्याचे शेख यांना समजले. त्यांनी संचालक डॉ. क्याटमवार, वीरसिह आणि बाहेती यांना संपर्क केला. त्यांनीही टाळाटाळ केली.

अध्यक्षाचे निधन होताच शाखेला टाळे २६ जून २०२५ रोजी अध्यक्ष देशमुख यांचे निधन झाले. त्यानंतर शेख यांनी मल्टीस्टेटच्या शाखेत जाऊन पाहणी केली तेव्हा ते बंद दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी तक्रार दिली. त्यावरून जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता विघ्नहर मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटीची नोंदणी ही २०१२ सालची आहे. मुख्य शाखा मार्केट यार्ड, ता. वसमत, जि हिंगोली येथे आहे. संचालक मंडळाने शेख यांच्याप्रमाणे अनेक ठेवीदारांना पैसे परत दिलेले नाहीत. त्यामुळे घोटाळ्याचा आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

अनेक मल्टीस्टेट घोटाळ्यांमध्ये ठेवीदार न्यायाच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी आयुष्यभराची जमापूंजी ठेवलेल्या ठेवीदारांचे कंबरडे मोडले आहे. यात बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा सर्वात मोठा घोटाळा, त्यापाठोपाठ छत्रपती -p एका उमे संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था, राजस्थानी मल्टीस्टेट, अजिंठा अर्बन, ज्ञानोबा पतसंस्था, यशस्वीनी, देवाई, आभा, राधाई अर्बन, मलकापुर अर्बन, बीडची छत्रपती मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून मालमत्ता जप्ती आणि आरोपींवर कारवाई सुरू असली तरी ठेवीदारांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT