Sand Smugglers : नवगाव-तुळजापूर परिसरात वाळू तस्करांचा धुमाकूळ file photo
छत्रपती संभाजीनगर

Sand Smugglers : नवगाव-तुळजापूर परिसरात वाळू तस्करांचा धुमाकूळ

पैठण तालुक्यातील नवगाव-तुळजापूर परिसरातील गोदावरी नदीत अवैधरीत्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sand Smugglers' Activities in the Navgaon-Tuljapur Area

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील नवगाव-तुळजापूर परिसरातील गोदावरी नदीत अवैधरीत्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी वाळू वाहतुकीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील नवगाव तुळजापूर गोदावरी नदीच्या परिसरामधून गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे. वाळू वाहतूक वाहनांमुळे शेतातील पाईपलाईनसह पिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे. त्रस्त झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

या वाळू तस्करीला संबंधित आर्थिक संबंधातून पाठबळ देत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. नवगाव परिसरातील कब्रस्तान समोरील गोदावरी नदीतून अवैधरित्या दररोज लाखो रुपयांची वाळू उत्खनन करून वाहतूक करण्यात येतअसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तुळजापूर येथून जवळपास सात ते आठ ट्रॅक्टर वरील लोखंडी यारी मशीनद्वारे वाळूचा उत्खनन करून तस्करी करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाने डोळेझाक केल्याने वाळूमाफियांची हिंमत वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT