पुलाच्या कठड्याला धडकून उलटल्याने ट्रॅव्हल्सचा चुराडा झाला. तर प्रवाशांचे सामान असे रस्त्यावर पडले होते. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Bus Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

१८ जण जखमी; बस पुलाच्या कठड्याला धडकून उलटली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर / फुलंब्री : नागपूरहून मुंबईकडे ३८ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला (क्र. एम पी-४१-झेड एच-९९५५) सोमवारी (दि. २३) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. नायगाव शिवारातील (ता. छत्रपती संभाजीनगर) चॅनेज क्रमांक ४२६ येथे चालकाला डुलकी लागल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती पुलाच्या कठड्याला धडकली व उलटली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत.

रघुनंदन दत्ता सांगडे (३५, रा. मुंबई) आणि विनोद उत्तम जाधव (रा. घोसगाव, ता. आर्णी, जि. यवतमाळ) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व फुलंब्री ठाण्याचे उपनिरीक्षक सुग्रीव चाटे व पथकाने स्थानिक मदत यंत्रणा व रुग्णवाहिकांच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रवीण शिवाजी राजेकर (रा. मुंगळा, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जखमींची नावे : अर्जुन खडसे, अन्नपूर्णा खडसे, शुभम वंजारी, शिवानी राठोड, वंदना जाधव, जयकुमार खंडारे, फारुख मोहम्मद अजीज (सर्व रा. ता. पुसद), दत्ता जाधव (सावंगी), देवानंद राठोड (आर्णी), गयबाई मासोळकर (उमरखेड), अरुणा भुमेकर (कळम), अजय भामुळकर (हिंगोली), लीला दाभाडे, केशव दाभाडे (भिवंडी), रेखा लोहे (वसई), रमेश भोपळे, छाया सांगडे (मुंबई) आणि मोहम्मद. सर्वांवर घाटीत उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT