अपघातात ट्रॅव्हल्स बसची झालेली अवस्था. दुसऱ्या छायाचित्रात कंटेनर व ट्रॅव्‍हल्‍सची झालेली धडक. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी जखमी

हडसपिंपळगाव शिवारातील चॅनल क्र. ४७७ जवळील घटना; अपघाताची मालिका सुरूच

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : समृद्धी महामार्गावर पुढे जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून भरधाव ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वैजापूर येथील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. हडसपिंपळगाव शिवारातील चॅनल क्रमांक ४७७ जवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ५३, रा. वैजापूर) असे मृताचे नाव आहे.अपघातात शिवलिंग खेडे, चंद्रकांत देवपुते, सतीश लिपने, कौस्तुभ शिनगारे, प्रांजल सोनार, जितेंद्र सोनार, विश्वजीत गवले, सुनील सोनवणे, संदीप वसईकर आणि लालचंद मेघवाल हे दहा प्रवासी जखमी झाले.

अहमदाबादहून लातूरच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स (एआर २० ए ९२९२) समृद्धी महामार्गावरून जात होती. हडसपिंपळगाव शिवारात चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्सने पुढे जाणाऱ्या कंटेनरला (यूके ०८ सीबी ७६६०) पाठीमागून जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रॅव्हल्स क्लीनरच्या बाजूने कंटेनरवर आदळल्याने त्या बाजूचा मोठा भाग चेपला.

विशेष म्हणजे चालकाला या अपघातात दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व महामार्गावरील बचाव यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले..

अपघातांची मालिका सुरूच!

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भरधाव वेग, चालकांचा थकवा, वाहनांवरील नियंत्रण सुटणे आणि अचानक होणारे अपघात यामुळे महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत अपघातांच्या एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT