Crime News : तरुणाने स्वतःवर झाडली गोळी file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : तरुणाने स्वतःवर झाडली गोळी

सिडकोतील धक्कादायक घटना, प्रकृती गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Young man shot himself

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील सिडको परिसरात एका तरुणाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी घडलेल्या या घटनेत समीर राजेंद्र नाईक (वय ३४) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करीत होता. वडिलांच्या निधनानंतर तो आई व धाकट्या भावासोबत राहत होता.

घटनेच्या वेळी घरात कोणीही नसताना त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. काही वेळाने आई घरी परतल्यानंतर समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तिच्या आक्रोशामुळे शेजारी व नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली.

दरम्यान, माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश गायकवाड व उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तपासादरम्यान घरातून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक रिकामे काडतूस जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अतिदक्षता विभागात उपचार

समीरच्या कानाजवळ गोळी लागल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. प्रारंभी त्याला शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून पुढील ७२ तास निर्णायक असल्याची माहिती डॉ. राजपूत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT