voter mapping Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar voter mapping : जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण

वैजापूर आघाडीवर, तर शहरात गती मंद; उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. या मोहिमेत शुक्रवारीपर्यंत (दि. २४) एकूण ३२ लाख ५१ हजार ८६२ मतदारांपैकी २३ लाख ९६ हजार ३२३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, एकूण प्रगती ७३.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी दिली आहे. उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये सिल्लोड (८६.३९%), कन्नड (८९.८०%), फुलंब्री (६९.६८%), औरंगाबाद मध्य (५४.९०%), औरंगाबाद पश्चिम (५८.८५%), औरंगाबाद पूर्व (५८.०८%), पैठण (८२.२१%), गंगापूर (७७.५७%) आणि वैजापूर (९२.५३%) अशी नोंद झाली आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी नायब तहसीलदार निवडणूक यांची बैठक घेतली.

बैठकीत प्रत्येक मतदारसंघातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी प्रगती कमी आहे. तेथे विशेष लक्ष देऊन काम गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्यक्ष फिल्ड भेटी

मतदार मॅपिंग मोहिमेत जनजागृती व लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच बूथ लेव्हल एजंट यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवून शंभर टक्के मॅपिंग पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ज्या भागांमध्ये कामाची गती मंद आहे, तेथे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन कामकाज वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्यक्ष फिल्ड भेटी घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT