Vaijapur Gangapur Road Eicher Tempo Collision  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Accident | वैजापूर-गंगापूर रोडवर आयशर - टेम्पोची धडक; लग्नाच्या वऱ्हाडातील 18 जण गंभीर जखमी

पैठण तालुक्यातील ग्रामस्थ लग्नसमारंभासाठी नाशिककडे जाताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

Vaijapur Gangapur Road Eicher Tempo Collision

वैजापूर : वैजापूर-गंगापूर मार्गावर घायगाव गावाजवळ गुरुवारी (दि. ४) भीषण अपघात झाला. लग्नाच्या वऱ्हाडासह नाशिककडे निघालेल्या आयशर आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सुमारे 15 ते 18 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील ग्रामस्थ लग्नसमारंभासाठी नाशिक जिल्ह्याकडे जात होते. यावेळी घायगाव परिसरात आयशर आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. बचावकार्य सुरू असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT