संभाजीनगरचे प्रशासन नव्या कारभाऱ्यांच्या हाती File Photo
छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरचे प्रशासन नव्या कारभाऱ्यांच्या हाती

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सीईओ यांची बदली

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar Transfer of District Collector, Municipal Commissioner, and CEO

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारने गुरुवारी (दि.२) A भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांचा समावेश आहे. त्यांच्या जागेवर नवे जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा, महापालिका आयुक्त म्हणून अमोल येडगे आणि सीईओ म्हणून मिन्न पी. एम. हे आले आहेत. त्यामुळे संभाजीनगरचे संपूर्ण प्रशासन बदलले आहे.

विनय गौडा जिल्हाधिकारी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शासनाने अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे, तर त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे बदलून आले आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी पद हे कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून त्या जागी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (दि. २) सायंकाळी भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली करण्यात आली आहे. गौडा हे महाराष्ट्र केडरचे २०१५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी कर्नाटक राज्यातील सुरतकल प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्रात बी. टेक. पदवी मिळवलेली आहे. दिलीप स्वामी हे गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. या दोन वर्षांत त्यांनी महसुली सेवांच्या सुलभीकरणासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले.

यात फेरफार अदालत, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण हेल्पलाईन, जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी, अधिकारी शेतकर्यांच्या बांधावर आदी उपक्रमांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्री अभियान राबविले. विनय गौडा यांना त्वरित नवीन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या उत्पन्न वाढीसह शहराला मुचलक आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पदभार स्वीकारल्यापासून सलग पावणेतीन वर्षे प्रयत्न करणारे आयुक्त जी. श्रीकांत यांची गुरुवारी (दि.२) नवी मुंबईतील राज्य जलजीवन मिशनच्या मिशन संचालकपदी बदली झाली. राज्य शासनाने त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती केली आहे. अचानक बदलीमुळे पदाधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर ऐकावसाय मिळाला.

सलग दोन वर्षे प्रशासक असलेले जी. श्रीकांत हे ३ मे २०२३ रोजी महापालिकेत रुजू झाले होते. पदभार स्वीकारताच त्यांनी शहर पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष दिले होते. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला. पहिले दीड वर्ष त्यांनी स्थानिक अधिकार्यांकडून सर्व शहराची माहिती घेत प्रशासनावर आपली पकड मजबूत केली.

त्यासोबतच शहरातील सर्व राजकीय नेत्यांसह मंत्री, आमदारांशी संवाद वाढवत शहर विकासावर लक्ष केंद्रित केले होते. शहरातील चारही मतदारसंघांतील नो नेटवर्क भागात त्यांनी ड्रेनेजलाईनचे काम मार्गी लावले. त्यासोबत नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहराला उपलब्ध व्हावे यासाठी मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेने काम पूर्णत्वाकडे नेले. १२५ पदांची पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली. कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीचा विमा, पंतप्रधान योजनेतून ११ हजार घरे यासह निवडणूक प्रक्रिया यशस् वीरीत्या राबविली. त्यामुळे महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांतूर बदलीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

अतिक्रमण मोहिमेमुळे नाराजी

शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बेकायदा बांधकामांवर प्रशासक कार्यकाळात जी. श्रीकांत यांनी बुलडोझर चालविला. यात गावठाणच्या नियमांनाही केरोची टोपली दाखविल्याने व गुंठेवारी नसल्याने मोबदला मिळणार नाही, असे आदेश जारी केल्याने अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, असे असले तरी ही शहरातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक पाडापाडी ठरली.

मिन्नू पी. एम. जि. प.च्या सीईओ

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिन्नू पी. एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवार (दि.२) जारी केले.

अंकित हे कडक शिस्तीचे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. १८ मार्च २०२५ रोजी जळगाव जिल्हा परिषद सीईओ पदावरून त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली होती. १९ मार्च २०२५ रोजी त्यांनी पदभार स्वीकारताच विविध प्रशासकीय सुधारणा राबवत कामकाजात गती आणली,

महाराष्ट्र केडरचे (२०१९ बॅच) आयएएस अधिकारी असलेल्या अंकित यांनी सेवाकर्मी प्लस या राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती.

दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या मिन्नू पी. एम. यांनी पोलिस लिपिक म्हणून नोकरी केली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी कोणत्याही कोचिंगशिवाय, स्वअभ्यासाच्या जोरावर यूप- ीएससी परीक्षेत देशात १५० वा क्रमांक मिळवला. मिन्नू यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजात अधिक वेग आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT