Woman Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

क्लासमध्ये झाली होती ओळख एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खासगी क्लासमध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, एका महाविद्यालयीन तरुणाने एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर 'लॉज'वर नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून गेल्या चार महिन्यांत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.३१) गुन्हा दाखल होताच आरोपीला बेड्या ठोकल्या. करण अरुण साळवे (२१, रा. ब्रिजवाडी) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची बारावी झाली असून, आरोपी करण साळवे हा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सिडको परिसरातील 'एका इंग्लिश शिकविणाऱ्या खासगी क्लासमध्ये या दोघांची ओळख झाली होती. पाहता पहाता या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. याच मैत्रीचा फायदा घेत करणने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी करणने पीडितेला सिडको बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी गोड बोलून त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला, तरीही त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या पहिल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. तसेच, 'मी तुझ्याशी लग्न करणार आहे' अशी खोटी थाप मारून त्याने तिला शांत बसवले.

याच धमकीच्या आणि लग्नाच्या आमिषाखाली त्याने गेल्या चार महिन्यांत तरुणीला चार वेळा लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडितेने एमआयडीसी सिडको ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक स्नेहल जाधव या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT