St Bus : संभाजीनगरहून निघालेल्या बस रस्त्यातच रुसल्या; एक पळेना अन् दुसरी जागची हलेना file photo
छत्रपती संभाजीनगर

St Bus : संभाजीनगरहून निघालेल्या बस रस्त्यातच रुसल्या; एक पळेना अन् दुसरी जागची हलेना

रात्रंदिवस प्रवाशांना विविध मार्गावर सेवा देणाऱ्या लालपरी व शिवशाहीची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचे शनिवारी (दि. १७) सकाळी विविध मार्गावर धावणाऱ्या बस चक्क रुसल्या.

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar st bus Maintenance and Repairs issue

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रात्रंदिवस प्रवाशांना विविध मार्गावर सेवा देणाऱ्या लालपरी व शिवशाहीची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचे शनिवारी (दि. १७) सकाळी विविध मार्गावर धावणाऱ्या बस चक्क रुसल्या. जणू त्यांनी चालकानांच सांगितले की, आमची पुढे जाण्याची इच्छा नाही. शेवटी त्या रुसलेल्या बसच्या मदतीला दुसऱ्या बस पाठवण्यात आल्या, आणि त्यांचा रुसवा काढला. शिवशाही फुलंब्रीत होती तर लालपरी वेरुळ येथे थांबून होती.

त्याचे झाले असे की, सकाळी ६ वाजता भुसावळला जाणारी शिवशाही (एमएच ०६ बीडब्लू-४३६७) छत्रपती संभाजीनगर आगार-२ मधून बाहेर पडली. ती फुलंब्री पर्यंत अशी तशी धावली तेथे गेल्यावर तिचे गियरच पडेनात. प्रयत्न केल्यानंतर गियर पडायला लागला परंतु ती काही जागेवरून हलायला तयार होईना. शेवटी चालकाने याची माहिती वरीष्ठांना दिल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता रिलीफ वाहन (एमएच ०६ बीडब्लू-४४३२) देण्यात आले. चालक वाहकांना तेथे तीन ते साडेतीन तास थांबावे लागले.

दुसरी पळेना

शनिवारी याच सकाळी ६.४५ वाजता सुरतकडे निघालेली लालपरी (६८७०) वेरूळ पर्यंत कशी बशी गेली. तेथे जाऊन थकल्यानंतर ती मात्र पुढे चालण्यास तयार होईना. चालकाने खुप प्रयत्न केले, परंतु तीला लोडच सहन होत नसल्याने ती जागेवरून हलत होती, पण वेग घेत नव्हती. याची माहिती मिळताच तेथेही सकाळी १०.३० वाजता रिलीफ वाहन देण्यात आले.

देखभालीवर प्रश्चचिन्ह

लालपरीसह शिवशाहीची योग्य रित्या देखभाल होत नसल्याची ओरड अनेक दिवसांपासून चालक वाहकांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अधिकारी मात्र याला दाद देत नव्हते. या दोन्ही बसचे ब्रेक डाऊन झाल्याची माहिती मिळताच यंत्र अभियंता चालन सुरेंद्र तांदळे आगारः २ मध्ये आले होते. वारंवार ब्रेक डाऊनच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी त्यांना घेराव घातला असता, तांदळे यांनी तेथून काढता पाय घेतला. वारंवार होणाऱ्या ब्रेकडाऊनमुळे चालक वाहकांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT