मिटमिटा येथील नव्या सफारी पार्कच्या कामाची पाहणी करताना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विरोधीपक्ष नेता अब्दुल समीर, आयुक्त अमोल येडगे, स्मार्टसिटीचे इम्रान खान. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar safari park : सफारी पार्क दिवाळीपर्यंत खुले होणार

सप्टेंबरमध्ये प्राण्यांचे स्थलांतर, शहराच्या पर्यटन उद्योगाला मिळणार चालना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्टसिटी प्रकल्पातून मिटमिटा परिसरात दीडशे एकर जागेत भव्य सफारी पार्क उभे करण्यात आले आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत हे पार्क नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश शुक्रवारी (दि. १७) महापौर समीर राजूरकर यांनी कामाच्या पाहणीवेळी दिले. त्यासोबतच सप्टेंबरमध्ये प्राण्यांचे स्थलांतर करावे, बाहेरून नवे प्राणी आणावेत, अशा सूचना देखील केल्या आहेत. तर मराठवाड्यातील हा एकमेव सफारी पार्क पर्यटना उद्योगाला चालणार देणारा ठरेल, असे सभापती अनिल मकरिये यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्षनेता अब्दुल समीर बिल्डर, उद्धवसेनेचे गटनेता गणेश लोखंडे, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि. १७) सकाळी सफारी पार्कच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. सफारी पार्कचे कन्सलटंट तथा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे निवृत सदस्य सचिव ब्रिजेश शर्मा यांनी झालेल्या कामांचे सादरीकरण केले. या सफारी पार्कमध्ये विविध ८० प्रजातींच्या प्राणी ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, प्राधिकरणाने मंजूर केलेल्या सफारी पार्कच्या आराखड्यात प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटर, ऑपरेशन थिएटर,ग्रंथालय, फुड कोर्ट आदी अनेक सोयी सुविधा असल्याचेही ते म्हणाले. तर सफारी पार्कमध्ये जे जे प्लास्टिक दिसत आहे, ते हळूहळू काढावे, पार्कमध्ये भाविष्यात प्लास्टिकचा एकही तुकडा येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आदेश स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना आयुक्त येडगे यांनी दिले.

शिफ्टिंगनंतर प्राण्यांना क्वारंटाईन ठेवणार

सिद्धार्थ उद्यानासोबतच बाहेरच्या प्राणिसंग्रहालयातून नवे प्राणी आणण्यात यावेत. सप्टेंबरपर्यंत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करावी. प्राणी आणल्यानंतर त्यांना ४५ दिवस विलगीकरण (क्वारंटाईन) करून ठेवावेत.

भव्य पार्किंग व्यवस्था

सफारी पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पार्किंगसाठी ७ एकर जागा ठेवण्यात आली आहे. त्यात एकाच वेळी २० बसेस, ३०० चारचाकी वाहने, ६०० हून अधिक दुचाकी उभ्या राहू शकतील, असे भव्य आहे. आयुक्त येडगे यांनी प्राण्यांसाठी गवताच्या झोपड्या उभारण्याचे आदेश दिले.

पर्यटनात होणार वाढ

मराठवाड्यात एकमेव भव्य व अद्ययावत असे हे सफारी पार्क रा-हणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांसोबतच या पार्कलादेखील देशीविदेशी पर्यटकांनी भेट द्यावे, यासाठी राज्यभरातच नव्हे तर देशभरात या पार्कचे प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT