Sambhajinagar ranks among the top 10 in the country under the Agriculture and Food Grains Scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे. तर महाराष्ट्रातून या योजनेत जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला असून, यामुळे कृषी विकासाला चालना मिळणार आहे.
केंद्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली. कमी उत्पादकता, कमी पीक विविधता आणि कमी पतपुरवठा असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृषी विकासाला चालना देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे आणि सिंचन सुविधांवर भर दिला जाणार आहे.
पीक विविधता वाढविणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच साठवणूक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ३६ विविध योजनांचा समन्वय साधून कृषी विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तसेच शेती अधिक सक्षम करण्यास निवडीबद्दल जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन जिल्ह्याला कृषी क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
योजनेचे मुख्य उद्देश
उत्पादकता वाढवणेः निवडक जिल्ह्यांमध्ये पिकांचे उत्पादन वाढवणे.
सिंचन सुविधाः सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) आणि जलसंधारणाला चालना देणे. पीक वैविध्यः
शाश्वत शेती पद्धती आणि पीक विविधतेचा अवलंब करणे.
आधुनिक सुविधाः काढणीपश्चात साठवणूक सुविधा आणि कर्जाची उपलब्धता सुलभ