जप्त सायलेन्सरवर पोलिसांनी असा रोडरोलर चालवून चेंदामेंदा केला. यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | बुलेटच्या जप्त ७०५ सायलेन्सर्सवर शहर पोलिसांनी फिरवला रोडरोलर

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मेकॅनिकला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना धडकी भरवणाऱ्या बुलेट राजांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ज्या सायलेन्सरच्या आवाजाने शहरवासीय त्रस्त होते, त्याच ७०५ सायलेन्सर्सचा शुक्रवारी (दि.१०) पोलिस मुख्यालयात रोडरो-लरखाली चेंदामेंदा करण्यात आला.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या कडक भूमिकेनंतर शहर वाहतूक शाखेने मार्च महिन्यात शहराचा कानाकोपरा पिंजून काढला. केवळ दंड आकारून न थांबता, पोलिसांनी या समस्येच्या मुळावरच घाव घातला आहे. मार्च महिन्यात वाहतूक पोलिसांनी १०२८ बुलेट व अन्य दुचाकी चालकांवर धडक कारवाई करत ७०५ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त केले होते. ते नष्ट करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

यावेळी उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्यासह पोलिस निरीक्षक राजेश यादव, अविनाश आघाव, सहाय्यक निरीक्षक हरेश्वर घुगे, सुनील कराळे, सचिन मिरधे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आता पोलिसांची नजर मेकॅनिक व गॅरेजवर

पोलिसांनी आता आपला मोर्चा बुलेटस्वारांसोबतच तर सायलेन्सर बदलून देणाऱ्या मॅकेनिक व गॅरेज व विक्रेत्यांकडे वळवला आहे. असा बदल करून देणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मेकॅनिकला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT