मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय file photo
छत्रपती संभाजीनगर

मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय

बसायची व्यवस्था नाही : पिण्यासाठी पाणीही नाही

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Passengers inconvenienced at Mukundwadi railway station

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाहून सिडको-हडको व गारखेडा परिसरातील हजारो प्रवासी दररोज विविध ठिकाणी प्रवास करतात. रेल्वे प्रशानाने प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उन्हाच्या तडाख्यात सावलीच्या शोधात तसेच पिण्याचे पाण्यासाठी प्रवाशांना भटकंती करून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्थानक मुख्य रेल्वेस्थानकाच्या खालोखाल महत्त्वाचे स्टेशन होत आहे. येथून दररोज ७ ते ८ हजार प्रवासी चढ उतार करतात. त्यामुळे महसूलही चांगला मिळत आहे. असे असतानाही रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत आहे. येथे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही व्यवस्था नाही.

तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच रेल्वेची प्रतीक्षेत बसण्यासाठी बाकडे नसल्याने प्रवाशांना जागा मिळेल तेथे प्लॅटफॉर्मवर खाली बसून रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकावर भुरट्या चोरट्यांचा सुळस ळाट असल्याने महिला प्रवासी सतत तणावाखाली येथून प्रवास करत आहेत. याबाबत अनेकदा रेल वेप्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाने काहीच निर्णय घेतला नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुपर फास्टला थांबा नाही कोरोना पूर्वी येथे सर्वच गाड्यांना थांबा देण्यात आला होता. दरम्यान सध्या सुपर फास्ट गाड्यांना थांबा दिला नसल्याने या परिसरातील प्रवाशांना मुख्य रेल्वेस्थानकात उतरून घर जवळ करावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पाण्याची सुविधा नाही

प्रवाशांना पिण्यासाठी नळ बसवण्यात आला आहे, परंतु येथे पाणी नाही आणि बसवलेला नळ तुटलेला असल्याने प्रवाशांना नाविलाजाने विकत पाणी घ्यावे लागत आहे. यासह अनेक असुविधांचा सामना येथील प्रवाशांना करावा लागत आहे.

रेल्वेस्थाकनात वाहनांचा वावर

येथील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याने अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार थेट रेल्वेस्थानकातून वाहने दामटवत असतात. यामुळे रेल्वेस्थानकावरच अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांना कुठलीही शिस्त नसल्याने ते रेल्-वेस्थानकाच्या गेटवरच गर्दी करतात. प्रवाशांना अक्षरशः ओढून रिक्षात बसवतात. अशा-वेळी रिक्षाचालक व प्रवाशांत अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT